भुसावळ । येथील स्वयंदिप कर्मचारी संघटनेतर्फे शिलरत्न बुध्द विहारास शित शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. संघटनेचे पोहनीकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी नगरसेवक उल्हास पगारे, बुध्दविहार समितीचे सदस्य सुनिल तायडे, सुनिल ढिवरे, बबलू ठाकूर, मनोहर पारधे, अनिल कदम, अजय शिरतुरे, शशिकांत पवार, सोनू आढाव, विनोद यशोदे, प्रशांत सपकाळे, विनोद मोरे, एम.बी. सोनवणे, एकनाथ पांडव आदी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी शिलरत्न बुध्द विहार समिती, स्वयंदिप कर्मचारी संघटना व शिलरत्न महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सुनिल तायडे यांनी तर आभार सुनिल ढिवरे यांनी मानले.