भुसावळ- सेंट अलॉयसीयस स्कूलमध्ये झालेल्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत शाळासिद्धीविषयी माहिती देण्यात येऊन 2018-19 चे स्वयंमूल्यमापन तत्काळ ऑनलाईन नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेत गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी तेजस प्रधान उपस्थित होते. या कार्यशाळेत शाळासिद्धीविषयी डॉ. जगदीश पाटील, मंगला जंगले व बी.बी.जोगी यांनी तर शालेय पोषण आहाराविषयी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात विषयतज्ञ संजय गायकवाड यांनी कार्यशाळा आयोजनासंबंधी सांगितले. त्यानंतर मंगला जंगले यांनी शाळासिद्धीची संकल्पना आणि स्वरूप पीपीटीद्वारे स्पष्ट केले. बी.बी.जोगी यांनी बाह्यमूल्यमापन आणि शाळासिद्धीतील अपडेट याविषयी माहिती पीपीटीद्वारे दिली.
ऑनलाईन नोंदणीचे आवाहन
डॉ.जगदीश पाटील यांनी ऑनलाईन माहिती कशा पद्धतीने भरावी याविषयी पीपीटीद्वारे प्रत्यक्ष उदाहरण देऊन समजावून सांगितले. 2018-19 या शैक्षणिक वर्षाचे स्वयंमूल्यमापन येत्या महिनाअखेर भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असून त्यानुसार आपल्या शाळांमध्ये असलेल्या क्षेत्रनिहाय माहितीचे संकलन करून वास्तववादी माहिती शाळासिद्धीच्या वेबसाईटला ऑनलाईन नोंदवावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. शालेय पोषण आकार अधीक्षक सुमित्र अहिरे यांनी शालेय पोषण आहार संबंधी सूचना अध्यापकांना दिल्या.