स्वयंसेवक घडला की घडते उत्तम राष्ट्र -डॉ.चंद्रशेखर पाटील

0

यावल- संघाची शक्ती ही दैनंदिन शाखा आहे. आपले उद्दिष्ट हे शाखा केंद्रित असले पाहिजे. एका तासाच्या शाखेवर शारीरिक व्यायाम, खेळ, बौद्धिक, सांघिक गीत, प्रार्थना यातून स्वयंसेवकाचा शारीरिक मानसिक विकास होत असतो आणि स्वयंसेवक घडला की उत्तम राष्ट्र घडते.असे विचार डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी व्यक्त केले. ते येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने विजयादशमी निमित्त आयोजित पथसंचलन कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीनिमित्त येथे शहरात पथसंचलन झाले.पथसंचलन व्यास नगरातून निघून महाजन गल्ली, खिर्नीपूरा, मेन रोडने जुना भाजी चौक, सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, चावडी, आईडीबीआय बँक, मेन रोड, रेणूकादेवी मंदिरावरून देशमुख गल्ली, व परत व्यास नगर या मार्गावरून करण्यात आले. पथसंचलन मार्गावर महिलांनी सडे घालून रांगोळ्या काढल्या होत्या. पथसंचलन कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका कार्यवाहक संतोष भोई यांनी तर आभार जयवंत माळी यांनी मानले.