रावेत – जागतिक महिला दिनानिमित्त शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने व नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रंमाक 17 मधील युवती आणि महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सेल्फ डिफेन्स तंत्र, लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा याचे प्रशिक्षण दिले. महिला दिनानिमित्त या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणाची प्रेमलोक पार्कमधील महात्मा फुले विद्यालय, प्रेरणा शाळा वाल्हेकरवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी येथे सोय करण्यात आली होती. तसेच महिलांसाठी चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क, चिंतामणी गणेश मंदिर या पाच विभागामध्ये सोय करण्यात आली होती, अशी माहिती करुणा चिंचवडे यांनी दिली.