स्वस्त धान्याचा काळाबाजार ; मन्यारखेड्यानजीक रीक्षा पकडली

0

वरणगाव- विजयी दशमीच्या दिवशी मन्यारखेडा येथून रेशनचे धान्य काळ्या बाजारात जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी गव्हाच्या सहा गोण्या असलेली एक रीक्षा पकडून वरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिली मात्र प्रशासनाकडून फिर्याद देण्यास कोणीही पुढे न आल्याने अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. गुरुवारी सायंकाळी 7 ते 7.30 वाजेदरम्यान मन्यारखेडा (ता.भुसावळ) येथील रेशन दुकानातील गव्हाच्या सहा गोण्या एका रीक्षातून काळ्या बाजारात जात असल्याचे ग्रामस्थांना कळाल्यानंतर ग्रामस्थांनी रीक्षा थांबवली. वरणगाव पोलिस स्टेशनला देखील कळवले. यानुसार पोलिसांनी रीक्षा ताब्यात घेतली. रीक्षा पकडल्याबाबत महसूल प्रशासनाला सूचना दिल्याचे वरणगावच्या एपीआय सारीका कोडापे यांनी सांगितले.