स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणाठी धरणे आंदोलन

0

प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन : अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

भुसावळ- स्वस्त धान्य दुकान दुसर्‍या दुकानाला जोडल्याचा राग आल्याने जातीवाचक शिविगाळ करणार्‍या भागवत परशुराम पाटील यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी माजी नगरसेविका नंदा निकम यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करत प्रशासनाला निवेदन दिले.

अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
शहरातील रेशन दुकान क्रमांक 54 च्या चालक नंदा प्रकाश निकम यांच्या दुकानाला सतत बंद राहणारे रेशन दुकान क्रमांक 19/1 हे प्रांताधिकार्‍यांनी जोडले होते. याचा राग आल्याने या दुकानाचे मालक भागवत पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी नंदा निकम व त्यांच्या परीवाराला जातीवाचक शिविगाळ करुन तुम्ही हे सर्व स्वस्त धान्य दुकान लवकरात लवकर बंद न केल्यास तुम्हाला जिवे ठार मारेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी नंदा निकम यांनी पोलिसांनी तक्रार अर्ज करुन संबंधीत भागवत पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, या आशयाची तक्रार दिली होती मात्र या प्रकरणी प्रशासनाने कारवाई केली नाही. पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्याने शुक्रवारी त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. तयात नंदा निकम, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश निकम, शारदा भोसले, सिता कावडे, वैशाली तायडे, सविता चौधरी, वच्छलाबाई घोरपडे, नमजा महेबूब शेख, सुशिला चव्हाण आदींसह प्रभागातील महिला व पदाधिकारी सहभागी झाल्या.