स्वाइन फ्लू नसतांनाही औषधोपचार केला, रुग्णाने जीव गमावला

0

मुंबई : केईएम रुग्णालयात ताप असल्याने दाखल झालेल्या एक रुग्णाला तेथील नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी त्या रुग्णाला स्वाइन प्लूची औषधे दिली. त्यानंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला. पुढील तपासात त्या रुग्णाच्या शरीरात स्वाइन प्लूची लक्षण निर्माण झाली नव्हती, अशी धक्कादायक माहिती समोर आली. या सर्व प्रकारामुळे खळबळ माजली आहे. स्वाइन फ्लूची लागण होऊ नये म्हणून स्वाइन फ्लूची औषधे घेणे हे अत्यंत धोकादायक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टेमीफ्लूची औषधे प्रतिबंधात्मक उपचार म्हणून घेऊ नका
जोवर स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत नाहीत, तोवर कुणीही स्वाइन फ्लूची टेमीफ्लू ही औषधे घेऊ नयेत, अनावश्यक औषधे घेणे हे शरीराला घातक ठरू शकतात, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. समाजात सध्या स्वाइन फ्लूबाबत नाहक भीती निर्माण करण्यात आली आहे. रुग्णालयातील कर्मचारी वर्गाकडूनही रुग्णालयाच्या मनात भीती निर्माण केली जात आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्वाइन फ्लूची टेमीफ्लू ही औषधे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरू नये, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

लक्षणे निर्माण झाल्यावरच औषधे घ्या
केइएम रुग्णालयात नर्स आणि वॉर्डबॉय हे औषध विभागातून टेमीफ्लूची औषधे रुग्णांना परस्पर देतात. प्रत्यक्षात ही औषधे देण्याआधी संबंधित रुग्णामध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे निर्माण होणे आवश्यकत असते. त्यासाठी 10 दिवस प्रतिक्षा करावी लागते, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. यावर्षी स्वाइन फ्लूच्या तापाने एकूण 322 जणांचा राज्यभरात मृत्यू झाला असून त्यातील 25 जण मुंबईतील होते. त्यामुळे या आजाराबाबत सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.