स्वाईन फ्ल्यूची भीती…

0

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील सर्व शाळांना सुरूवातीलाच घेण्यात येणाऱ्या प्रार्थना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. स्वाईन फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे आरोग्य सचिव प्रशांत त्रिवेदी यांनी सांगितले आहे.

या वर्षी १३ ऑगस्टपर्यंत स्वाईन फ्ल्यूचे ६९५ रूग्ण उत्तर प्रदेशात आढळले आहेत. त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला. सरकारने स्वाईनचा प्रसार थांबविण्यासाठई शीघ्र आरोग्यकृती दले स्थापन केली आहेत. ती जिल्ह्यांमध्ये कामे करीत आहेत. जिल्हा रूग्णालयांमध्ये या रूग्णांसाठी वेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

राज्यातील शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी मुले एकत्र येतात त्यातुनही हा रोग पसरू शकतो. उत्तर प्रदेश सरकार आता जास्तच सावध झाले आहे. शाळांमधील प्रार्थनाबंदीचा आदेश सरकारी आणि खाजगी शाळांनाही लागू असेल असे आरोग्य सचिवांनी सांगितले आहे.