स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

0

पिंपरी-चिंचवड : शहरात मंगळवारी 71 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळांतर्फे प्रभातफेर्‍या काढण्यात आल्या, तसेच विविध सामाजिक संघटना, संस्थांतर्फे शालोपयोगी साहित्याचे वाटप, रुग्णांना फळवाटप, निराधारांना आर्थिक मदत, विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

महापालिका : मुख्यालयात महापौर नितीन काळजे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : खराळवाडी येथील कार्यालयात शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक राजू मिसाळ, विजय लोखंडे, मंहमद पानसरे, सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर उपस्थित होते.

शिव प्रतिष्ठान, सांगवी : ज्येष्ठ पत्रकार जनार्दन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे आध्यक्ष विक्रम धुमाळ, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, आकाश पांचाळ, अमित मडई, संजय गंवंडाळकर, निलेश गाडेकर, प्रथमेश खूने, पंकज धाराशिवकर आदी उपस्थित होते.यावेळी आण्णा जोगदंड यांनी व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व बंधुता देणारे भारतीय संविधानाच्या प्रतीचे वाटप केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ : अभियांत्रिकी महाविद्यालयात ध्वजवंदन समारोह उत्साहात पार पडला. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघिरे महाविद्यालय, पिंपरी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य डॉ. प्रभाकर ताकवले यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले, डॉ. सतिष बोंगाणे, प्रा. माया गायकवाड, प्रा. दिपक जांभुळे प्रा. ढगे, प्रा. डी. एस. कदम उपस्थित होते. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम शिस्त दाखवित परेड सादर केली. परेड कमांडर म्हणून आरती नाना कुंजीर या विद्यार्थिनीने, तृप्ती वाडकर आणि तेजस्विीनी झुरंगे या विद्यार्थिनींनी पायलट म्हणून, साहिल पवार या आर्मी मुलांसाठी, तेजस्विनी काशीद या विद्यार्थिनीने आर्मी मुलींसाठी, ऋषिकेशजांभळे नेवीसाठी फ्लॅग होल्डर म्हणून पद भूषविले. आकाश गायकवाड, आरती कुंजीर, प्राजक्ता कडलग, कांचन झेंडे यांना आर्मीसाठी तर कॅप्टन रसिका कांबळे हिला नेव्हीसाठी रँक वाटप करण्यात आली.

शिवाजी राजे विद्यालय : चिंचवड येथील श्री.शिव छत्रपती शिवाजी राजे विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक परीवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजय कराळे, सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी अर्चना घाणेगावकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब जाधव होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, संस्थेचे सचिव विजय जाधव, संस्थेचे मुख्याध्यापक पाटील व देशपांडे यांची उपस्थिती होती.

जैन सोशल ग्रुप : स्वातंत्र्यदिन आणि जैन सोशल ग्रुप इंटरनॅशल फेडरेशनचा 37 वा स्थापना दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी जैन सोशल ग्रुप डायमंडचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अनुप शहा होते. यावेळी जैन सोशल ग्रुपचे शरद शहा, लालचंद जैन, सतिश बाफना, मनीष शहा, प्रवीण चोपडा, हसमुख जैन, डॉ. राजेश दोशी, अनिता शहा, सौरभ शहा आदी उपस्थित होते. अनुप शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मनीषा जैन यांनी सूत्रसंचालन केले. पंकज गुगळे यांनी आभार मानले.