स्वाभिमानी, सेना, भाजपाचा स्वबळाचा नारा

0

मुंबई । राज्यात सरकारमध्ये असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटन,शिवसेना व भाजपा याच्यातील युतीची बातचीत फसकटली आहे. त्यामुळे या पक्षांनी स्वबळावर नारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भाजपाच्या उमेदवाराच्या पालखीला खांदा देणार नाहीत असे रोखठोक भूमिका खासराद राजू शेट्टी यांनी यांनी सागितले.तर भाजपाच्या कोअर कमेटीची बैठक झाली असून तिकिट वाटपाचे अधिकार हे मुख्यंमत्री व प्रदेशध्यक्ष यांना देण्यात आले आहे. तर भाजपाने स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार देण्यात आले आहे.त्यामुळे जिल्हा पातळीवरून युतीचा प्रस्ताव आल्यास त्याला मजुरी देण्यात येईल.उद्धव ठाकरेंनी जो 60 चा आकडा प्रस्तावात दिलेला आहे, त्यावरती पूर्ण विराम दिलेला आहे, त्यापलिकडे उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असंही संजय राऊत यांनी निक्षून सांगितले.यामुळे युती झाली तर स्थानिक पातळीवर होईल नाहीतर येत्या निवडणुकामध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. सरकारमध्ये असलेल्या सहकारी पक्षांनी येत्या निवडणूकीत स्वबळाचा नारा दिला आहे.

पालखीला खांदा देणार नाहीत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फक्त भाजपच्या उमेदवाराचाच प्रचार करावा अशी कोणाची भूमिका असेल, तर ते आता शक्य नाही. राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराच्या पालखीला खांदा देणार नाहीत असं खासदार शेट्टी म्हणाले. सरकारमधील माणसाने आक्रमक व्हायचे नसते, तर चळवळीमधील माणसाने आक्रमक व्हायचे असते. सध्या सदाभाऊ खोत सरकारमध्ये आहेत आणि मी चळवळीमध्ये आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत सरकारमध्ये असल्याप्रमाणे वागतात आणि मी आक्रमकपणे वागतो, असे सांगत सदाभाऊंच्या आक्रमकपणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांवर शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिले.

60 जागा ही तडजोडच
उद्धव ठाकरेंनी जो 60 चा आकडा प्रस्तावात दिलेला आहे, त्यावरती पूर्ण विराम दिलेला आहे, त्यापलिकडे उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असंही राऊत यांनी निक्षून सांगितलं. शिवसेना 60 जागा देतेय ही तडजोडच आहे. खर तर 50 किवा 55 असायला हवी होती, पण 60 ही युती टिकावी, युती रहावी म्हणून केलेली तडजोड आहे,आमच्या सर्व सहकार्‍यांचं म्हणणं आहे की हा आकडा सुद्धा जास्त आहे. मुंबईवर शिवसेनेचा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अधिकार आहे.मागे काय झालं ते विसरा तुम्ही वर्तमानात जगा भविष्यकाळ हा शिवसेनाच आहे. असे संजय राऊत यांनी सांगितलं.शिवसेना जास्तीत जास्त जागा लढवेल. युती असो अथवा नसो, बहुमताचा आकडा शिवसेना पार करेल अशी शिवसेनेची ताकद असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. मुंबईवर जोपर्यंत शिवसेनेचा वरचष्मा आहे, तोपर्यंत राष्ट्रीय हित सुरक्षित आहे, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यासाठी तयार राहण्याचे संकेत दिले. शाखा निहाय बैठकीत शिवसैनिकांना याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मातोश्री येथे वर्सोवा, अंधेरी पूर्व-पश्चिम, विलेपार्ले आणि वांद्रे पूर्व-पश्चिम येथील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची आढावा बैठक झाली. यावेळी उद्धव यांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.आता असे लढा की या पुढे कोणाकडेच जाण्याची गरज लागणार नाही, स्वबळावर आपला महापौर बसवू असे स्पष्ट शब्दात सांगितल्याची माहिती दिली.

भाजपकडून मुंबईचे तुकडे
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता न आल्यास भाजप मुंबईचे तुकडे पाडेल, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. इथे दुसर्‍या कोणाचं राज्य येण्याचा प्रयत्न झाला तर मुंबईचा तुकडा पाडायला हे दिल्लीमधले आणि मुंबईतले काही लोकं बसले आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला. मुंबई वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी शिवसेनेचा वरचष्मा पाहिजे. यामुळे जो 60 आकडा उद्धव साहेबांनी दिला आहे तो अत्यंत विचारपूर्वक आणि सन्मानपूर्वक दिलेला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

तिकीट वाटपाच अधिकार
भाजप नेत्यांची बैठक संपली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे हे नेते उपस्थित होते. राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाली.