स्वामी समर्थ केंद्रात चंद्रकांत मोरे यांच्या हस्तेवृक्षारोपण

0

जळगाव। श्री. स्वामी समर्थ केंद्र जानकीनगर व संत सावतानगर श्री स्वामी समर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार 27 जुलै रोजी वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय श्री स्वामी केंद्र दिंडोरी प्रणीत महाव्यवस्थापक चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण प्र्रकृती विभागाअंतर्गत करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना चंद्रकांत मोरे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे सांगितले. यात जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन तसेच वृक्ष संवर्धन या विषयांवर मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी केंद्र संचालक देविदास धांडे, वसंत पाटील, शेखर नेवे, निकम, तुषार चौधरी, प्रविण देशमुख, बाणाइत काका, आप्पा माळी आदी उपस्थित होते. फोटो काढण्यापुरते वृक्षरोपण न करता त्याचे संगोपन संबंधीत केंद्राने करणे गरजेचे असल्याचे मत मोरे यांनी प्रकट केले. जानकीनगर केंद्रातर्फे सुट्टीच्या दिवशी दर रविवारी निघणारी पालखी वृक्षारोपण व पाणी अडवा पाणी जीरवा योजनेबद्दल आध्यत्माच्या माध्यमातून सुंदररीत्या सेवाकर्‍यांना योग्य पद्धतीने पर्यावरण प्रतिनिधी वसंत पाटील यांनी नियोजन केले असल्याचे मोरे यांनी पाटील यांचे कौतुक केले.