पिंपरी : शाहूनगरातील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा झाला. महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नारायण बहिरवडे होते. यावेळी एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांचे ‘हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा’ या विषयावर विनोदी कार्यक्रम झाला. संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके यांनी प्रास्ताविक व संघाचा वार्षिक आढावा सादर केला. प्रकाश शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अशोक सुर्यवंशी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत भोळे, के. बी. शिंदे, ब्राह्मणे, कुलकर्णी, खडके, राजू गुणवंत, संतोष शेळके, श्रीकांत लोमटे, शेखर आपटे, तसेच रेखा शेळके, मनिषा देव, सौ. दळवी, सौ. नलगे, सौ. ब्राह्मणे, श्रीमती गाढे नेरकर यांनी परिश्रम घेतले.