स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान

0

पिंपरी – जागतिक महिला दिनानिमित्त कासारवाडी येथील शेल पेट्रोल पंपावर काम करणार्‍या महिलांचा स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिक शशांक भालेराव व हरिष पिल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, सुरेखा वाडेकर, निरजा देशपांडे व शेल पेट्रोल पंपचे मॅनेजर रविंद्र शिरसाठ आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक शशांक भालेराव म्हणाले की, भारतीय महिला आज कोणत्याही क्षेत्रात माघे नाहीत. आपले घर संभाळून या महिला पेट्रोल पंपावर काम करतात. या महिलाना वाहनांमध्ये पेट्रोल भरणे, पैशांचा हिशोब अचुक ठेवणे तसेच ना ना प्रकारच्या माणसांना सामोरे जावे लागते. हे आजच्या घडीत फार जोखमीचे काम आहे. तसेच पेट्रोल पंपावरील महिलांच्या कामाची दखल घेतल्या मुळे इतरही महिलांना या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळेल असे शेल पेट्रोल पंपचे मॅनेजर रविंद्र शिरसाठ यांनी सांगितले.