स्वा. रा. ती. वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रिरोगतज्ञांची परिषद संपन्न

0

प्रसूतीपश्चात अति प्रमाणात होणाऱ्या रक्तस्त्रावासाठी दक्षता व तातडीच्या उपचाराची गरज – डॉ. बनसोडे

अंबाजोगाई : स्वा. रा. ती. वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे स्त्रिरोग व प्रसूतीशात्र विभाग, जीवदया फाउंडेशन व आय एम ए, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रिरोगतज्ञांची एक दिवसीय परिषद घेण्यात आली. या परिषदेमधे मराठवाड्यातील एकूण चारशे डॉक्टरांनी सहभाग घेतला. एवढया प्रमाणात डॉक्टरांचा सहभाग असणारी ग्रामीण भागातील ही पहिलीच परिषद ठरली.

या परिषदेमध्ये प्रसूतीपश्चात अतिप्रमाणात होणारा रक्तस्राव, गरोदरमातांना येणारे झटके, सन्मानपूर्वक मातृत्व सेवा या व इतर विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रसूतीपश्चात अति प्रमाणात होणाऱ्या रक्तस्त्रावासाठी दक्षता व तातडीच्या उपचाराची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. बनसोडे यांनी केले. या परिषदेमध्ये डॉ. श्रीनिवास गडप्पा (औरंगाबाद), डॉ. अरुण महाले (नांदेड), डॉ. अशोक थोरात (बीड), डॉ. भाऊराव यादव (लातूर), डॉ. संजय बनसोडे (अंबाजोगाई), डॉ. मिताली गोलेच्छा (अंबाजोगाई) या प्रसिद्ध स्त्रिरोगतज्ञांनी मार्गदर्शन केले.

स्त्रिरोग विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी या परिषदेचे आयोजन केले. परिषदेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले. डॉ मिताली गोलेच्छा यांनी मुख्य कार्यवाहक ही भूमिका पार पाडली. परिषदेला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे निरीक्षक म्हणून डॉ. शैलेश वैद्य उपस्थित  होते.

या चर्चासत्राला डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ राकेश जाधव व इतरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. प्रियांक सिंग, डॉ कल्याणी मूळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. प्रकाश पाटील डॉ पुष्पदंत रुग्गे, डॉ. अभिजित पाटील, डॉ. वर्षा वरपे, सुनील जोगदंड यांनी परिश्रम घेतले.