स्व.खा.मुकेशभाई पटेलांना मान्यवंराचे अभिवादन

0

शिरपूर। माजी खासदार स्व.मुकेशभाई पटेल यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त आ.काशिराम पावरा, टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 9 वाजता प्रतिमा पूजन करुन सामुहीक श्रद्धांजली वाहण्यात आली.

विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल, एस.व्ही.के.एम. संस्थेच्या विविध शाखा, शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व शाखांचे प्राचार्य, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुलाबपुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी आमदार काशिराम पावरा, टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, सौ. रीमा तपनभाई पटेल, चि. आधिश पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक अ‍ॅड.सी.बी.अग्रवाल, बबनलाल अग्रवाल, गोपाल भंडारी, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, फिरोज काझी, पिपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, हसमुखभाई पटेल, नगरसेवक सुरेश बागुल, शिरपूर मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, नाटुसिंग गिरासे, सुरेश खानापूरकर, सुभाष कुलकर्णी, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, दिलीप पटेल, जाकीर शेख, के.डी.पाटील, काशिनाथ राऊळ, वासुदेव देवरे, नितेंद्र राजपूत, सौ.संगिता देवरे, श्रेणिक जैन, विजयसिंग गिरासे, जगतसिंग राजपूत, नितीन गिरासे, अमोल पाटील, कैलासचंद्र अग्रवाल, उत्तमराव माळी, मोतीलाल माळी, भटू माळी, गुलाब भोई आदी उपस्थित होते.