स्व.बाळासाहेबांचीच प्रेरणा घेऊन मी समाजकारणात

0

माजी आमदार शिरीष चौधरी; नव्वदव्या जयंतीनिमित्त फैजपूरात अभिवादन सभा

फैजपूर (प्रतिनिधी)- राजकारणात अनेक नेते समाजकारण विसरून जातात पण बाळासाहेब यांनी कधी राजकारण केले नाही त्यांनी पूर्ण आयुष्य समाजकारणात स्वतःला वाहून घेतले आहे त्याच शिकवणीचे बाळकडू मला त्यांनी दिले असल्याने त्यांची प्रेरणा घेऊनच मी समाजकारण करीत असल्याचे माजी आमदार शिरीष चौधरी अभिवादन सभेत म्हणाले. स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या शनिवारी 90 व्या जयंतीनिमित्त लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसीत सकाळी 8.30 वाजता अभिवादन सभा झाली. कॉलेजमध्ये असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
माजी खासदार उल्हास पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा टेकाम होले, मसाका व्हा.चेअरमन भागवत पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, यावल पंचायत समिती उपसभापती उमाकांत पाटील, रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, रवींद्र हरी पाटील, तापी परीसर विद्या मंडळाचे चेअरमन लिलाधर चौधरी, उपाध्यक्ष एस.के.चौधरी, के.आर चौधरी, अमोल भिरुड, प्रभात चौधरी, अजित पाटील, ग.स सदस्य तुकाराम बोरोले, एस.एम.चौधरी, डॉ.प्रमोद इंगळे, माजी प्राचार्य डॉ.जी.पी. पाटील, माजी नगरसेवक केतन किरंगे, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.आर.एल.चौधरी, प्रभारी प्राचार्य पिंगला धांडे यासह यावल, रावेर तालुक्यातील कार्यकर्ते, मधुस्नेह परीवार, सर्व संस्थेतील मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.