स्व.बिदेश्‍वरी प्रसाद मंडल यांच्या जन्मशताब्दी साजरी

0
पिंपरी: ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी लढणार्‍या स्व.बिदेश्‍वरी प्रसाद मंडल यांच्या जन्मशताब्दी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पिंपरी येथे ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने मंडल यांना आदरांजली वाहण्यात आली. मंडल यांनी देशातील विविध वाड्या-वस्त्यांवर फिरून देशातील 3700 पेक्षा अधिक मागास जातींचा अभ्यास केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत डोके होते. तर काळुरामशेठ गायकवाड विश्‍वस्त पश्‍चिम महाराष्ट्र माळीसमाज, ज्ञानेश्‍वर भुमकर, ओबीसी संघर्ष समिती अध्यक्ष आनंदा कुदळे, प्रवक्ते सुरेश गायकवाड, नेहूल कुदळे, सरचिटणीस वैजिनाथ सिरसाठ, कायदा सल्लागार अ‍ॅड.रवींद्र कुदळे, महात्मा फुले जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अजय जाधव, सामाजिक कार्यकर्त्या कविता खराडे, मिना कोरडे, साधना टिळेकर, अरुणा कुंभार ओबीसी महिला अध्यक्षा, महात्मा फुले मंडळ अध्यक्ष हनुमंत माळी, बाळकृष्ण करे, ज्ञानेश्‍वर फड, जगदिश माळी, राजु माळी, अनिल गिरमे, अरूण बकाल, राजेंद्र टेंबे, सदानंद माने आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.