स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

0

पिंपरी-चिंचवड :- स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भाजपा चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महेश कुलकर्णी म्हणाले, भाजपचे लोकनेते नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम केले. त्यांचे स्थान कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्याही मनात आहेत. मुंडे यांची स्मृती चिरकाल स्मरणात राहावी अशी आहे. आमदार जगताप यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या आणि आमच्या या आदरणीय नेत्याचे विकासाचे स्वप्न साकार करणे आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल करणे हीच त्यांना आदरांजली, अशा शब्दांत आमदार जगताप यांनी मुंडे यांच्याविषयीच्या आदरभावना व्यक्त केल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, प्रदेश चिटणीस उमाताई खापरे, नगरसेवक विलास मडिगेरी, शितल शिंदे, प्रियांका बारसे, सिमा चौगुले, प्रमोद निसळ, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, विठ्ठल भोईर, वैशाली खाड्ये, संदिप नखाते, प्रमोद ताम्हणकर, छाया पाटील, संजय मंगोडकर, अदिती निकम, सचिन गायकवाड, चंद्रकांत तापकिर, सुरेश पाटिल, रामकृष्ण राणे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.