हंबर्डी । या गावाचा अभ्यास करता येथील अनेक दिग्गज प्रत्येक निवडणुकीत आपआपल्या जोरावर बाहेरील उमेदवारांना सहकार्य करुन त्यांना निवडून आणतात. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही निवडणुकीत गावातील एकही उमेदवार दिसून आलेला नसल्यामुळे यावेळच्या पंचायत समितीसाठी मात्र गावातूनच उमेदवार देण्याचा निश्चय केला जात आहे.
कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत येथील पुढारी बाहेरील उमेदवारांना 100 टक्के सहकार्य करुन आपआपल्या उमेदवाराची मतपेटी भरतात. परंतु गावाच्या नशिबी आलेले दुर्दैव म्हणजे इतिहासात आजपर्यंत एकही उमेदवार मसाकामध्ये यावल कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध फेडरेशन, जिल्हा बँक यासह स्थानिक गटातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेेत एकही उमेदवार नाही. त्यामुळे विविध राजकीय संस्थांमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टीने मुद्दे मांडणे अडचणीचे ठरते. त्यामुळे आपला हक्काचा उमेदवार आपल्या अडचणी सोडविण्यासाठी एखादे नेतृत्व आपल्या गावातून मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता गावातील इच्छुकांनाच निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा रंगत आहे.