वरणगाव । येथील नगरपरिषदेंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेचा लाभ नागरिकांनी वैयक्तीक शौचालय बांधकाम करण्याकरीता घ्यावा. शासनाकडून 12 हजार रुपये व नगरपरिषदेकडून अर्थसाह्य 5 हजार रुपये अनुदान देणे तसेच शौचविधी संदर्भात नागरिकांनी उघड्यावर शौचास बसु नये तसेच उखड्यावर शौचास बसल्याने होणारे दुर्धर आजार याविषयी जनजागृतीचे शहरात पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी नगरसध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक सुधाकर जावळे, राजेंद्र चौधरी, सुनिल काळे, रविंद्र सोनवणे, गणेश चौधरी आदी नगरसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. हगणदारीमुक्तीकरीता शहरातील विविध प्रभागात पथनाट्य सादरीकरण करण्यात येवून जनजागृती करण्यात आली होती तर सुंदर शहर स्वच्छ शहर करीता योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषद वरणगाव करीत आहे.