हजारो भाविकांचे दत्त दर्शन

0

शहादा । नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याचा अश्‍व मेळावा व एकमुखी दत्तप्रभू च्या याञेला मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत दुसर्‍या दिवशी ही हजारो भाविकांनी दत्ताचे दर्शन घेतले तर घोडे बाजारात 1600 पैंकी सुमारे 193 अश्‍वांची विक्री होऊन 48 लाखांची उलाढाल झाली. सांरगखेडा या अश्‍व बाजाराला 300 वर्षांचा इतिहास आहे. हा भारताचा सर्वात मोठा अश्‍व महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये भारतीय वंशाचे अश्‍व प्रदर्शन, अश्‍व दौड आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी एमटीडीसीने या चेतक मोहत्सवाला जागतिक पटलावर नेण्याचा प्रयत्न केला आहे.

अध्यात्मिक, सांस्कृतिक पर्यटनाचा आनंद
राज्यातील कुठल्याही पर्यटन स्थळावर नसतील अश्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांचा उत्सव उत्सव एक महिन्यांचा करण्यात आला आहे. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सारंगखेड्यात श्रीदत्त जयंती निमित्त एकमुखी श्रीदत्ताची यात्रा भरते. याठिकाणी अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा आनंद एकत्र घेता येतो. या अनोख्या यात्रोत्सवात दरवषी तीन ते पाच लाख भाविक श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी येतात. या सर्व भाविकांना श्री दत्त दर्शनासोबत ओढ लागलेली असेते ती येथे भरणार्‍या जागतिक दर्जाच्या घोडे बाजाराची.

पर्यटकांसाठी शामियान्यांची उभारणी
देशातील अश्‍व प्रेमी तर या यात्राचे आतुरतेने वाट पाहतात. देशातीलच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यातून अश्‍व प्रेमी या घोड्याच्या बाजाराला भेट देतात आणि घोड्याची खरेदी विक्री करतात. यावर्षी हा घोडे बाजार आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. देशविदेशातून येणार्‍या पर्यटकांसाठी येथे विशेष शामियाने उभारण्यात आले आहेत. डोळ्याने पारणे फेडणार हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल भेट देतात.

घोडे व्यापर्‍यांची यात्रेस पसंती
या घोडे बाजारात पंजाब, हरियाणा, कच्छ, काठियावाड, उत्तर प्रदेश तसेच राज्यातील मोठे घोडे व्यापारी आणि अश्‍व शौकीन आपले घोडे येथे आणतात. अनेक अश्‍व प्रेमी तर घोड्याला लोकांनी दाद द्यावी यासाठी आपले अश्‍व या यात्रेत आणतात. सुरक्षित वातावरण, उज्वल परंपरा आणि घोडी खरेदीसाठी येणार्‍या चाहत्याची सख्या येथे मोठी असल्याने अश्‍व व्यापारीही या यात्रेत मोट्या संख्येने सहभाग नोंदवत असुन आता पर्यंत 1600 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.