हडकाई नदीवर तस्करांकडून बांबूच्या टिपर्‍यांसह सागवान चौकट जप्त

0

अंधाराचा फायदा घेत संशयीत पसार ; यावल वनविभागाची कारवाई

यावल- यावल वनविभागाच्या गस्ती पथकाने मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास हडकाई नदीच्या काठावर लाकूड तस्करांना पकडले मात्र अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून दोघे संशयीत पसार झाले. संशयीताच्या ताब्यातून एका दुचाकीसह सागवानी लाकडाच्या दहा चौकटी तसेच बांबूच्या 690 टिपर्‍या मिळून 25 हजार 736 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमाल यावल डेपोत जमा करण्यात आला. ही कारवाई धुळे विभागीय वन अधिकारी उमेश वावरे, यावल उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनपाल सुनील पाटील, वनरक्षक संदीप पंडित, वनरक्षक रवींद्र बी.पवार, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तडवी, वाहन चालक भारत बाविस्कर यांच्या पथकाने केली.