हडपसरमध्ये टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड

0

पुणे – पुण्यामध्ये मागाल काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. काल शनिवारी रात्री हडपसर येथील ससाणेनगर भागातील गल्ली नंबर १० मध्ये एका टोळक्याने 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामध्ये दुचाकी आणि चार चाकी गाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणातील आरोपी ओंकार गिरमे , निखिल तिकोटे , श्रीकांत जाधव , औदुंबर बिराजदार , महेश गायकवाड आणि इतर तीन जणांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्य ताब्यात दिले. यावेळी सत्तुर्या उर्फ राजेश नेवसे हा आरोपी तेथून पसार झाला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.