तीन दिवस 4500 क्सूसेस चार दिवस पाणी मिळणार ; दीपनगरसह रेल्वे, जळगाव एमआयडीसीलाही होणार लाभ
भुसावळ- तब्बल दोन आठवड्यांपासून टंचाईचे चटके सोसणार्या भुसावळकरांना हतनूरचे आवर्तन सुटल्याने दिलासा मिळाला आहे मात्र 31 जानेवारीपर्यंत हे पाणी पालिकेच्या बंधार्यात पोहोचणार असल्याने तो पर्यंत टंचाईचे चटके सोसण्याशिवाय शहरवासीयांना पर्याय नाही. हतनूर धरणातून शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ शहरासह दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, मध्य रेल्वे प्रशासन व जळगाव एमआयडीसीसाठी 11.25 दलघमीचे आवर्तन सोडण्यात आले असून प्रतिदिन चार दिवसांपर्यंत चार 500 क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, भुसावळ पालिकेच्या बंधार्यात 31 जानेवारीपर्यंत आवर्तन पोहोचणार असल्याचे भुसावळकरांना सहा दिवस टंचाईच्या झळा सोसण्याशिवाय पर्याय नाही.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने सुटले आवर्तन
शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान पाटबंधारे विभागाला जिल्हाधिकार्यांचे आवर्तनाबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुपारी एक वाजता आवर्तन सोडण्यात आले. शुक्रवार ते मंगळवार दरम्यान चार हजार 500 क्युसेस अर्थात 11.25 दलघमीचे आवर्तन देण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी उन्हाळ्याची स्थिती पाहता पालिकेने बंधार्याची उंची पावणेदोन फुटांनी वाढवल्याने किमान 22 दिवसांऐवजी आता 35 दिवस साठा टिकून राहणार आहे.