भुसावळ- लाभ क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून सलग तिसर्या दिवशी शुक्रवारी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीला पूर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हतनूरचे 36 दरवाजे उघडून विसर्ग केला जात होता मात्र शुक्रवारी सकाळपासून धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाण्याची आवक कमी झाल्याने 26 दरवाजे बंद करण्यात आले. सध्या दहा दरवाजे पूर्णपणे उघडून 682 क्युमेक्स 24 हजार 088 क्युसेस प्रतीसेकंद वेगाने नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे तर उजव्या तट कालव्यातून 11.33 क्युमेक्स वेगाने विसर्ग होत आहे. धरणात विसर्गानंतर 209.570 मीटर जलपातळी कायम असून 181.40 दलघमी जलसाठा ठेवण्यात आला आहे.