भुसावळ- हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळी सात वाजता धरणाचे 14 दरवाजे 50 सेंटीमिटरने उघडण्यात आले असून तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवार आणि रविवारी हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्र तसेच तापी व पूर्णा नदीच्या उगमस्थळाच्या परीसरात समाधानकारक पाऊस झाला. यामुळे हतनूर धरणात सोमवारी सकाळी पाण्याची आवक वाढली. धरणाचे 14 दरवाजे 50 सेंटीमिटरने उघडून प्रतीसेकंद 329 क्युमेक्स अर्थात प्रतीसेकेंद 11 हजार 620 क्युसेस वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणार्या बर्हाणपूर, देडतलाई, टेक्सा, गोपाळखेडा, चिखलदरा आदी पर्जन्यमापन केंद्रांवर समाधानकारक पावसाची नोंद करण्यात आली आहे.