शिंदखेडा – तालुक्यातील हतनूर येथील भाजीपाला विक्रेता स्वप्निल राजेंद्र पाटील या 24 वर्षीय युवकाने मंगळवारी दुपारी तीन वाजता त्याने सुकवद येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. सायंकाळपर्यंत मृतदेह सापडला नव्हता. शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.