हतूनर धरणावर प्रथमच आढळला अत्यंत दुर्मीळ ‘रेड फालोरोप पक्षी’

0

भुसावळ (विजय वाघ)- हतनूर धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने या भागात दक्षिणेतून युरोपकडे जाणारे विदेशी पक्षांचा अधिवास वाढला आहे. यामध्ये अत्यंत दुर्मीळ अशा रेड फालोरोप पक्षाची उत्तर महाराष्ट्रात प्रथमच नोंद झाली आहे. यामुळे या धरणाचे महत्व वाढले असून या धरणाला ‘रामसरचा’ दर्जा देण्यात यावा, अशी मागणी चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली आहे.

दुर्मीळ पक्षाने लावली हजेरी
हतूनर धरण खान्देशातील एक महत्वाचे जैवविविधता अधिवास क्षेत्र निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत हतनूर धरणातील पाण्याची पातळी खालावत असल्याने दलदल निर्माण झाली आहे. यामुळे काही पक्षांसाठी उपयुक्त खाद्य उपलब्ध होत असल्याने दक्षिणेतून युरोपकडे जाणारे पाणपक्षीही हतनूर धरणाकडे आकर्षित होत आहेत. यामध्ये अत्यंत दुर्मिळ अशा रेड फॅालोरेप पक्षाने प्रथमच हजेरी लावली आहे. हा पक्षी दक्षिणेतून युरोपात परतीचे मार्गक्रमण करीत असतो. मार्गक्रमणादरम्यान वाटेत कुठे चांगले खाद्य दिसल्यास काही दिवस तो त्या भागात मुक्काम करतो. या व्यतिरीक्तही हतनूर धरणावर प्रथमच विविध पक्षी आढळून आले आहेत. यामध्ये भांडखोर, पानलावा, बाकचोच्या, तुतारी, टेमिंक, चाटीलावा, मोठा आरली, छोटा सुरय, चमच्या अशा विविध नावाच्या पक्षांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे हतनूर धरणाला पक्षीमित्रांच्या माध्यमातून महत्व प्राप्त झाले असून मुंबई, पुणे अशा विविध शहरातील पक्षीमित्र हतनूर धरणावर विविध देशातील पक्षांची नोंद व निरीक्षण करण्यासाठी येतात. यामुळे या धरणाला महत्व प्राप्त झाले असून या धरणाला शासनाच्या माध्यमातून रामसरचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी चातक निसर्ग संवर्धन संस्थेने केली आहे.

वनविभागाची अनास्था
विविध देशातील दुर्मिळ अशा पक्षांचा या धरणावर अधिवास होत असल्याने या धरणाचे महत्व वाढले आहे मात्र जळगाव वनविभागाच्या अनास्थेमुळे या महत्वाच्या अधिवासाकडे दुर्लक्ष होत असल्याने पक्षी मित्रांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

अशा आहेत नोंदी
दुमिर्र्ळ अशा रेड फालोरप या पक्षाची प्रथम पाकिस्तानमध्ये सन 1864 मध्ये नोंद करण्यात आली. यानंतर भारतातील राजस्थानात सन-1948 नोंद झाली आहे. हा पक्षी ऑस्ट्रेलियातील बर्फाळ अशा आर्क्टीक या प्रदेशात प्रजननासाठी जातो.

रामसरचा दर्जा मिळावा
हतनूर धरण जळगाव जिल्हयातील महत्वाचे धरण असून या धरणावर विविध देशातील पक्षांचा दरवर्षी अधिवास आढळून येतो. अशा प्रसंगी निसर्गप्रेमीसांठी ही एक पर्वणी असते. यामुळे शासनाने या धरणाला रामसरचा देणे आवश्यक आहे, असे चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन म्हणाले.