हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा

0

भारीप बहुजन महासंघातर्फे बोदवड तहसीलदारांना निवेदन

बोदवड : अरविंद बनसोडे हत्याकांडातील आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारीप बहुजन महासंघ, बोदवडतर्फे तहसीलदारांना निवेनाद्वारे करण्यात आली. नाथ पवनी येथील अरविंद बनसोडे या आंबेडकरी कार्यकर्त्यास 27 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मयूर उमरकर याने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली व मारून टाकण्याची धमकी दिली व त्याच ठिकाणी काही वेळाने अरविंद विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळला होता व दोन दिवसांनी दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी भारीप-बहुजन महासंघातर्फे तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

हत्याकांड गुंडाळण्याचा प्रयत्न
आरोपी चे वडील हे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत व गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय व नातलग आहेत त्यामुळे पोलिस यंत्रणेने प्रकरण दाबले व हत्याकांड गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात 302 व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत कार्यवाही करून आरोपींना तत्काळ अटकेची मागणी करण्यात आली आहे व विविध ठिकाणी झालेल्या हत्याकांडाची चौकशीची मागणीही निवेदनात आहे. हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, आरोपींवर 302 हत्या व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाख करावा, प्रकरण दडपणार्‍या पोलिस निरीक्षकांनाही सहआरोपी करून निलंबित करावे., बनसोडे कुटुंबांना पोलिस संरक्षण मिळावे अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष सुपडा निकम, सलीम शेख, महेंद्र सुरळकर, गोपीचंद सुरवाडे, जितेंद्र सूर्यवंशी, सईद शाह शब्बीर शाह उपस्थित होते.