‘हनुमान चालिसा पठण स्पर्धा 2017’ चे आयोजन

0

जळगाव । युवा विकास फाउंडेशन व विष्णुभाऊ भंगाळे मित्र परिवार, जळगाव आयोजित केमिस्ट भूषण सुनिलदादा भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ’हनुमान चालिसा पठण स्पर्धा 2017’ दि. 22 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना दुपारी 12 वाजता बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.

बक्षीस वितरण हस्ते प.पु. महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज सतपंथ मंदिर संस्थान, फैजपूर, प.पू. शास्त्री स्वामी भक्तीकिशोर महाजन, स्वामीनारायण गुरुकुल सावदा, प.पू. दादा महाराज जोशी (चिमुकले राम मंदिर, जळगाव), सचिव जळगाव जिल्हा मेडीकल डिलर्स असो. जळगाव अनिल झंवर, माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ. स्नेहल फेगडे, ललितभैय्या चौधरी आदिंच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.