हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

0

जळगाव । हनुमान जयंतीनिमित्त आज मंगळवारी रोजी शहरातील हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासून विधीवत पूजा केली जाणार आहे. सायंकाळी भाविकांची मोठ्या प्रमाणांत दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने त्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी हनुमान जयंतीनिमित्त केसरीनंदन हनुमान व्यायामाशाळा मित्र मंडळातर्फे भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. त्यात असंख्य हनुमान भक्तांनी सहभाग नोंदविला होता. तर मंगळवारी देखील विविध मंडळांकडून ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात येणार आहे. तर शहरातील हनुमान मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेजवळील पत्र्या हनुमान मंदिर, गोलाणी मार्केट परिसरातील हनुमान मंदिर, चिमुकले राम मंदिरातील हनुमान मंदिर, भूषण कॉलनीतील श्रीमंत हनुमान मंदिर, स्टेशन रोडवरील पोलिस चौकीतील हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, शिवाजीनगरमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, शाहूनगरमधील तपस्वी हनुमान मंदिर, मायादेवी परिसरातील हनुमान मंदिर आदी ठिकाणी हनुमान जयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आले आहे. तर महाप्रसादाचेही यावेळी हनुमानजयंतीनिमित्त आयोजन मंडळांकडून करण्यात आले आहे.

हभप शरद महाराज यांचे कीर्तन
महर्षि वाल्मिक नगर मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त मंगळवार 12 एप्रिल रोजी सकाळी 4.45 वाजता वाल्मिक नगरातील हनुमान मंदिरात हनुमान जन्म व काकडा आरती, 6़ 30 वाजता लघुरुद्र महापूजा तर 11 वाजता महापूजा होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री 8.30 ते 11 वाजता मालेगाव येथील चौपटपाडा येथील हभप शरद महाराज यांच्या कीर्तनाचे ही आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी लाभ घ्याव असे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.

केसरीनंदन मंडळातर्फे मिरवणूक
शहरातील पिंप्राळा येथील केसरीनंदन मित्र मंडळातर्फे सोमवारी सायंकाळी 5 वाजता हनुमानजयंतीनिमित्त ढोल ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली आली. यावेळी मिरवणुकी असंख्य हनुमान भक्त सहभागी झाले होते. मिरवणुकी हनुमानाची मृर्ती ही आकर्षणाची ठरत होती. तर यात चांदीचा गदा देखील मिरवणुकीत अग्रभागी होती. मिरवणुक केसरीनंदन हनुमान मंदिराकडून रथचौक, कुंभार वाडा, मढी चौक मार्गे प्रशांत चौक, शिवाजी चौक यानंतर गांधी चौक तर समारोप पुन्हा केसरीनंदन मंदिरात करण्यात आला. मिरवणुकी हातात झेंडे घेवून बाल-गोपालही सहभागी झाले होते. मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिरावर रोषणाई
मंदिरांवर विद्युत रोशणाई व सजावट करण्यात आली आहे. बांभोरी येथील श्री गजानन महाराज मंदिरात हनुमान जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. पहाटेपासून पादुका पूजन, महाआरती होणार आहे. रिंगरोड, गोलाणी, पिंप्राळा येथील हुनमान मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आले असून मंदिर दिव्यांनी सजविण्यात आले आहेत. जयंतीच्या आधल्यादिवशी सोमवारी धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये भजन-किर्तन सुरू होते. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.