हनुमान मित्र मंडळातर्फे नागरी सत्कार सोहळा

0

नारायणगाव । येथील हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नारायणगाव ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच योगेश पाटे व सर्व सदस्यांचा मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त जि. प. प्राथमिक शाळा नं. 1 व 2 मधील मुलांसाठी वैज्ञानिक जादुगार प्रकाश शिरोळे यांचे जादूचे प्रयोग आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम संतोषभाऊ दांगट युवा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुन्ना काझी यांनी दिली.

नारायणगावच्या जनतेने श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलला एकहाती सत्ता दिली आहे. शहरासाठी विकास आराखडा तयार करून खासदार आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात शहराचा कायापालट करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केला आहे, असे मनोगत आशाताई बुचके यांनी व्यक्त केले. यावेळी माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, शाम पांडे, अनिल दिवटे, प्रा. रत्नाकर सुबंध, मेहबूब काझी यांची भाषणे झाली.यावेळी जि. प. पुणेच्या गटनेत्या आशाताई बुचके, माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, शाम पांडे, अर्चना माळवदकर, बाळासाहेब पाटे, गणेश कवडे, वसंतराव देशमुख, शंकरनाना कोल्हे, मेहबूब काझी, तान्हाजी डेरे, प्रा. रत्नाकर सुबंध, अनिल दिवटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष माळवदकर यांनी केले व सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर औटी यांनी केले.