तळोदा । शहरातील बस स्टॉपपासून प्रकाशा रस्त्याकडे जाताना हरकलाल नगर जवळील असलेल्या पुलाखालच्या लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या असून टाकलेल्या स्लॅब केव्हाही कोसळून पडण्याची व मोठ्या अपघात होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. तरी संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष्य देने गरजेचे झाले आहे.
अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका
तळोद्याहून प्रकाशाकडे जाणार्या बसेस केव्हा अवजड वाहने सिमेंटने भरलेल्या गाड्या, ऊसाने भरलेली ट्रॅक्टर अवजड भरलेल्या समानाने नेहमी वापर असल्यामुळे केव्हाही पुलाचा खाली पडू शकतात. केंव्हा पूलखाली कोसळू शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी होऊ शकते. प्राणहानी पण होऊ शकते या पुलाची डागाडुगी केंव्हा नवीन स्लॅप संबधित विभागाने टाकणे गरजेचे झाले असून प्राणहानी होण्या आगोदर सदर पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. एकाच वेळी दोन वाहने भरलेली आली म्हणजे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेने दुभाजक तयार झाल्यानंतर आजून पुलाची रुंदी कमी झाली आहे. वाहतुकीसाठी नेहमी अडचण निर्माण होते व या ठिकाणी नेहमी लहान मोठे अपघात होत असतात तरी संबंधितांनी पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.