जकार्ता : भारताचा कुस्तीपटू हरप्रीत सिंगने ग्रीको रोमन प्रकारात पदक निश्चित केले आहे. हरप्रीतने 87 किलो वजनीगटामध्ये उपांत्य फेरीत मजल मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या 87 किलो वजनीगटामध्ये हरप्रीचने जपानच्या मासाटो सुमीवर 8-0 असा विजय मिळवला. हरप्रीतने उपांत्य फेरीत मजल मारली असून त्यांचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.