‘हरवलेल्या आवाजाची फिर्याद’ कवितासंग्रहाचे रविवारी प्रकाशन

0

म्हसदी। जागतिकीकरणाच्या स्पर्धेत ग्रामीण जीवनशैलीची पडझड कशी होत चालली आहे यांचे सविस्तर वर्णन करणार्‍या साक्री येथील कवी रावसाहेब कुवर यांच्या कवितांचा ’हरवलेल्या आवाजाची फिर्याद’ या संग्रहाचे 20 ऑगस्ट रविवारी प्रकाशन सोहळा होत आहे. साक्रीच्या छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात जेष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सतिष बढवे यांच्याहस्ते प्रकाशन होणार आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपटटे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ’कवीता-रती’चे कार्यकारी संपादक प्रा. आशुतोष पाटील प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित राहणार आहेत. शहरी व ग्रामीण जीवनशैलीत येणार्‍या दाहक अनुभवांची मांडणी या काव्यसंग्रहातून कवी कुवर यांनी केलीआहे. ग्रामसेवकाची जबाबदारी सांभाळून कुवर हे कविता करतात. त्यांच्या कवितांचा उमविच्या एम.ए. मराठी द्वितीय वर्षच्या खानदेश मराठी साहित्य, कवी आणि कविता या अभ्यासक्रमात समावेश होता. तर जुन 2017 पासून प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात ही त्यांच्या कविता घेण्यात आल्या आहेत.