जिनेव्हा । भारताचा ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्णाला शेवटचा सामना बरोबरीत सोडवल्यामुळे जिनेव्हा ग्रापी बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शेवटच्या फेरीत हरिकृष्णाने चिवट झुंजीनंतर रशीयाच्या दिमित्रीला बरोबरीत रोखले. हरिकृष्णाने या स्पर्धेत 2 विजय मिळवले.