यावल- तालुक्यातील हरिपुरा येथील एका 17 वर्षीय युवकास सर्पदंश झाल्यानेे यावल रूग्णालयात दाखल करण्यात आले. युवकाचे नाव साहिल मोजूम तडवी (रा.हरिपूरा) असे आहे. तो बुधवारी दुपारी गावालगत असलेल्या केळीच्या शेतात गुरा- ढोरांना चार आणण्याकरीता गेला असता त्यांच्या डाव्या पायास सापानेे दंंश केला. यावल रूग्णालयात डॉ. रश्मी पाटील, आरती कोल्हे यांनी त्याच्यावर उपचार केले असून प्रकृती स्थिर आहे.