हरीयाणातील शस्त्र तस्कर जाळ्यात : चोपडा पोलिसांची कारवाई

सहा गावठी कट्टे व 5 जिवंत काडतूस जप्त : रॅकेटची शक्यता

चोपडा : चोपडा शहर बसस्थानक परीसरात हरीयाणातील दोन शस्त्र तस्करांच्या चोपडा शहर पोलिसांनी मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातून सहा गावठी कट्टे व 5 जिवंत काडतूस जप्त केले. अमितकुमार धनपत धानिया (30, रा.भागवी, ता.चरखी दादरी, जि.भिवानी, हरीयाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (32, रा.भागवी, ता.चरखी दादरी, जि.भिवानी, हरीयाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सोमवार, 22 रोजी सायकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास ही कारवाई कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शस्त्र तस्कर गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. बसस्थाक परीसरात चोपडा पोलिसांनी सापळा रचून सोमवारी सायंकाळी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून दोन लाख 60 हजार किंमतीचे 12 गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच पाच हजार रुपये किमंतीचे 5 पिवळ्या धातूचे जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. दोघे संशयीत शस्त्र विक्री करण्यासाठी आले असता ही कारवाई करण्यात आली.

चोपडा पोलिसात गुन्हा उदाखल
चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपींविरोधात हवालदार किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दोघं संशयित आरोपींजवळून 12 गावठी बनावटीचे कट्टे, पाच जिवंत काडतूस व तीन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरीक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस नाईक संतोष पारधी, संदीप भोई, किरण गाडीलोहार, प्रमोद पवार, प्रकाश मथूरे आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.