जळगाव। हरीविठ्ठलनगरातील तरूणाने शुक्रवारी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा कर्मचारी सचिन राजाराम सूर्यवंशी (वय 31) हा हरीविठ्ठलनगरात त्याच्या कुटुंबियांसह राहत होता. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सूर्यवंशी कुटुंबीय झोपले. रात्री 1.45 वाजेच्या सुमारास सचिन याची आई चंद्रकला सूर्यवंशी यांना जाग आली.
कुटुंबियांचा आक्रोश…
त्या पाणी पिण्यासाठी गेल्या असता सचिन याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी आरडा ओरड केली. त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबियांसह आजुबाजुचेही जागे झाले. त्यांनी तत्काळ सचिनला खाली उतरवून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे आतपकालीन वैद्यकीय अधिकार्यांनी घोषीत केले. आत्महत्तत्या करणार्या सचिनच्या पश्चात आई, पत्नी, रोहीत (वय 6), साहील (वय 4) असा परिवार आहे. सचिनने गळफास घेतल्याने त्याला सिव्हीलमध्ये दाखल केले होते. मात्र त्या ठिकाणी त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यामुळे कुटुंबियांनी आक्रोश केला.