भुसावळ- शहरातील अयोध्यानगरातील रहिवासी हर्षल संतोष चव्हाण (वय 23) या युवकाचा मृतदेह मंगळवारी उड्डाणपुलाजवळील रेल्वेमार्गावर सापडला होता तर त्याचा मृत्यू घातपाताने झाल्याची आरोप कुटुंबियांनी पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी सर्व बाजूंनी बारकाईने तपासाला सुरुवात केली आहे शनिवारी बाजारपेठ पोलिसांना घटनास्थळी हर्षलचा तुटलेला मोबाईल, तडवी नावाच्या व्यक्तीचे पॅनकार्ड आणि 500 रुपयांची नोट सापडल्यानंतर ती जप्त करण्यात आली तर ती नोट खेळण्यातील नकली नोट असल्याचे तपासाधिकारी उपनिरीक्षक निशीकांत जोशी म्हणाले. पॅनकार्डवरील तडवी नामक व्यक्तीची चौकशी होणार असून हर्षलच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स पोलिसांनी मागवले आहेत. हर्षलचा मृत्यू होण्याआधी ज्यांनी-ज्यांनी त्याला पाहिले त्यांच्याकडून चौकशी केली जात असल्याचे जोशी म्हणाले.