हर्षवर्धन पाटील यांनी घेतली भुजबळ यांची भेट

0

इंदापूर । राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची  मुंबई येथे लिलावती हॉस्पिटल मध्ये जाऊन माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय तसेच विविध विषयांवरती सुमारे सुमारे सव्वा तास चर्चा झाली. सध्या छगन भुजबळ हे लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

छगन भुजबळ यांची अ‍ॅन्जिओग्राफी तपासणी करण्यात आली. त्यात सर्व अहवाल नाॉर्मल आले आहेत. छगन भुजबळ यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहीती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.आघाडी सरकारमध्ये 15 वर्षे छगन भुजबळ व हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित काम केले असल्याने दोघांमध्ये मैंत्रीचे संबंध आहेत.या भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी छगन भुजबळ यांना लवकर तंदुरुस्त होऊन राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी होणेसाठी सदिच्छा दिल्या.