हलगर्जीपणा करणारा तलाठी निलंबीत

0

भुसावळ । येथील तलाठी एन.आर. ठाकूर यांनी कामात हलगर्जीपणा व शिस्तभंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी शुक्रवारी केली, यामुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. निलंबनाच्या काळात ठाकूर यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात थांबावे असे आदेशात नमूद केले आहे. ठाकूर हे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष आहे. येथील शहर तलाठी एन.आर. ठाकूर यांच्याबद्दल आलेल्या तक्रारी आणि त्यांनी कामात केलेल्या हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत पोचल्या होत्या. या सर्वाचा परिणाम तलाठी ठाकूर यांच्यावर निलंबनाची कुुर्‍हाड कोसळली, त्याच्याकडे भुसावळ, सतारे आणि कंडारी येथील तलाठीपदाचा पदभार होता.