हल्लाबोल, गुजरात फॉर्च्युन जायंट्सची रणनीती

0

मुंबई। प्रो लीगच्या पाचव्या सत्रातील सामन्यांसाठी चार नवीन संघ घेण्यात आले आहेत. तामिळनाडू, गुजरात, हरियाणा आणि उत्तरप्रदेश असे हे चार नवे संघ आहेत. या चार संघामुळे लीगचा पसारा, सामने, कालावधी सगळेच वाढले आहे. यातील गुजरात संघाची मालकी अदानी समुहाच्या अदानी विल्मर लिमिटेडकडे आहे. अहमदाबादमध्ये हा संघ आपले सामने खेळणार आहे. संघ जरी नवीन असला तरी लीगमध्ये खेळलेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंचा त्यात समावेश आहे. यावेळी झालेल्या लीगच्या खेळाडूंच्या लिलावादरम्यान या संघाच्या व्यवस्थापनाने खेळाडूंची खरेदी केली ते पाहिल्यावर या संघापासून सगळ्यानाच सावध रहायला लागणार आहे.

अशी आहे संघाची मांडणी
गुजरात फॉर्च्युन जायटंस संघाने एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या लीगमध्ये प्रवेश केला असल्याचे खेळाडूंच्या लिलावाच्यावेळीस स्पष्ट झाले होते. लिलावातील पहिल्या दिवशी या संघाने फक्त तीन खेळाडूंची निवड केली. त्यानंतर लिलावादरम्यान स्मार्टनेस दाखवत या संघाने एक मजबूत संघ उभा केला आहे. या संघाने भारतीय खेळाडूंपेक्षा इराणच्या फजल अत्रालली आणि अबझोर मोहम्मद मिघानी खरेदी करुन चलाखी दाखवली. मागील वर्षी फजल लीगमध्ये सर्वोत्तम बचावपटू ठरला होता. याशिवाय तो दोन वेळा विजेत्या संघाचा सदस्य होता. अबझोरसाठी गुजरात फॉर्च्युन जायंट्सने सर्वाधिक 50 लाख रुपये मोजले.

गुजरात जायंट्सचा संघ
बचावपटू : परवेश भंसवाल, सुनीलकुमार, फजल अत्रालली, अबझोर मोहम्मद मिघानी, सी कलई अरासन, विकास काळे, मनोजकुमार. आक्रमक : सुकेश हेगडे, महेंद्र रजपूत, सचिन, अमित राठी, सुलतान डांगे, पवनकुमार, राकेश नरवाल, चंद्ररेन रंजीत. अष्टपैलू : सेआँग रायओल किम, महिपाल नरवाल, रोहित गुलिया.