चाळीसगाव । तालुक्यातील उंबरखेड शिवारातील शेतात आई सोबत गेलेल्या काठेवाडी 8 वर्षीय बालकावर 8 जुलै 2017 रोजी दुपारच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने त्यात बालकाचा मृत्यू झाला होता या प्रकरणी आमदार उन्मेश पाटील व वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांच्या पाठपुराव्याने आज दिनांक मयत मुलाच्या आई वडीलांना उंबरखेड येथील नदी जवळ असलेल्या त्यांच्या वाड्यावर 8 लाखाचा धनादेश देण्यात आला.
आमदारांसह वनविभागाचा पाठपुरावा
तालुक्यातील उंबेरखेड येथील नदी किनारी खंडोबा मंदीराजवळ वाड्यावर राहणारे काठेवाडी कुटुंबातील महिला लक्ष्मीबाई काळु चौहाण या उंबरखेड शिवारातील शेतात गुरांसाठी गवत कापत असतांना शेजारी त्यांचा 8 वर्षीय मुलगा राहुल काळु चौहाण हा दुपारच्या वेळेस खेळत असतांना शेजारील उसाच्या शेतातुन बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याने त्यात बालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आमदार उन्मेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी वनविभागाकडे पाठपुरावा केल्याने मयत बालकाच्या आई वडीलांना वनविभागाकडुन मदत म्हणुन 8 लाख रुपये मंजुर झाले.