शिरपूर येथील लॉजवरील घटना
; संशयितानेच दिली मोबाईलवरुन तरुणीच्या कुटुंबियांना मारल्याची माहिती
शिरपुर- लग्न झाले अन् माहेरी आल्यानंतर प्रियकराच्या भेटीसाठी शिरपूर येथे आलेल्या नववधूची प्रियकराने गळा चिरुन हत्या केल्याची थरारक घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. महिनाभरापूर्वी धुळे शहरात अशाच प्रकारे लॉजवर प्रेमप्रकरणातून विवाहितेची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच शिरपूर येथे प्रेमप्रकरणातून नववधूच्या हत्येने शिरपूरसह जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. रेणुका चेतन सोनवणे रा. शिरपूर असे मयत नववधूचे नाव आहे.
तालुक्यातील जातोडा येथील रेणुकाचे माहेर आहे. ती शिरपूर शहरातील एसपीडीएम महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची विद्यार्थीनी होती. 23 मार्च रोजी तिचा चोपड्यातील चेतन उर्फ हेमंत मधुकर सोनवणे हिच्याशी झाला होता. यानंतर 24 रोजी ती माहेरी जातोडा येथे आली होती.
लग्नापूर्वी तरुणीसोबत लग्नासाठी जबरदस्ती
शिरपूर शहरातील वडगल्ली येथील नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे हा रेणुका ला नेहमी त्रास द्यायचा. तिच्याशी लग्न करण्यासंबंधी तिला जबरदस्ती करीत असायचा. ही गोष्ट रेणुकाने आई वडिलांना सांगितली होती. मात्र बदनामी होऊ नये म्हणून गुन्हा दाखल केला नव्हता होता. माहेरी आल्यानंतर 25 सोमवारी सकाळी 9:30 वाजता रेणुका गावात चहा पिण्यासाठी जाते असे सांगून घरुन निघाली. यावेळी तिने तिचा मोबाईल घरी ठेवला. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रेणुकाच्या मोबाईलवर फोन आला. पप्पू शेटे बोलतोय मी रेणुकाला मारले असल्याचे सांगून त्याने फोन कट केला. आमोदा परिसरातील निलकंटेश्वर महादेव मंदिरामागे संगीता रेसिडेन्सी पार्क येथे तरुणीची गळा चिरुन खून केल्याची घटना समोर आल्यानंतर रेणुका असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मिनाबाई मोतीलाल धनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात भाग 5 गुरनं 74/2019 कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत आहेत.
कागदपत्रांशिवाय कशी होते रुम उपलब्ध?
कोणत्याही कागदपत्रांशिवाय या प्रेमी युगुलांना रूम उपलब्ध होते. कुठलीही चौकशी न करता मिळणार्या पैशांतून संबंधितांना रुम दिली जात असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे. कागदपत्रे तपासली तर माहिती मिळून घटना टळू शकेल. महिनाभरापूर्वी धुळे शहरात लॉजवरच जळगावच्या विवाहितेची हत्या झाली होती. आता तरी पोलिसांनी लॉजमालकांना सक्तीने नियम पाळण्याच्या सुचना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.