हवालदार विजयसिंग राजपूत अखेर बडतर्फ

0

धुळे । पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी पदभार घेताच पहिला दणका देत वाळू तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या एका हवालदाराला बडतर्फ केले. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे. धुळे पोलीस दलातील हवालदार विजयसिंह राजपूत हे नरडाणा येथे कार्यरत असतांना वाळूच्या तस्करी प्रकरणी त्यांच्या विरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात तत्कालीन तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी राजपुत यांना अटक झाली होती. या कारवाईमुळे पोलीस दलाची बदनामी झाली म्हणून राजपूत यांना पोलीस दलातून बडतर्फ का करण्यात येवू नये अशी विचारणा नोटीसीद्वारे केली होती. तर या नोटीसीला कुठलेही उत्तर राजपूत यांच्याकडून प्राप्त न झाल्याने पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी याबाबत कठोर निर्णय घेत राजपूत यांनाखात्यातून बडतर्फ केले.