नंदुरबार । शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या हस्ती बँक फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. बँकेत चोरी झाल्याची घटना 30 रोजी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. तेथून 21हजार 300 रुपये चोरांनी लांबविली आहे. मात्र बँकेतील मोठी रक्कम सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेत सीसीटीव्हीची हार्ड डिस्क लांबवली गेली आहे. अलार्म सिस्टीमही बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरीतच चोरांनी ही बँक फोडण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे खळबळ उडाली आहे.