हाच का भारताचा सर्वोत्तम संघ?:विराट कोहली

0
लंडन: भारत वि. इंग्लंडः चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाची पाठराखण केली आहे . मागील 10-15 वर्षांतील हा भारताचा सर्वोत्तम संघ असल्याच्या दावा शास्त्री गुरुजींनी केला होता. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली भारतीय संघाच्या कामगिरीबद्दलच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. त्याचे उत्तर देताना कोहली आनंदी दिसत नव्हता.मागील 15 वर्षांतील भारताचा हा सर्वोत्तम संघ असल्याच्या शास्त्री यांच्या दाव्याचे संघाने दडपण घेतले होते का? तुला खरचं त्या दाव्यात तथ्य वाटते का? असे प्रश्न एका पत्रकाराने कोहलीला विचारले. त्यावर कोहलीने आपला राग आवरत अगदी शांतपणे उत्तर दिले. तो म्हणाला,”आमचा संघ सर्वोत्तम आहे, असा आमचा विश्वास आहे. तो आम्ही ठेवू नये का?” कोहलीने पत्रकारांकडून आलेला पहिला बाऊंसर अगदी चपळाईने सोडला.