हाजी एन.एम.सय्यद विद्यालयात दोन विद्यार्थी प्रथम

0

कासोदा । माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2017चा ऑनलाईन निकाल मंगळवारी 13 रोजी जाहीर झाला. कासोदा येथील हाजी एन.एम. सैय्यद ऊर्दू हायस्कूलचा निकाल 57.42 टक्के लागला असून शेख आदिलोद्दीन नईमोद्दीन, शेख जुनैद शेख आरिफ या दोन्ही विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे 83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे.

जुफी अली असलम अली याने 80 टक्के गुण मिळवून व्दितीय, शेख दानिश शेख अलीम याने 79.80 टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यालयातून 101 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक एन.जी.शेख, चेअरमन हाजी हमीद अली, सेक्रटरी हाजी तैय्यब अली, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.