हाडाखेड येथे अवैध दारू घेवून जाणार्‍या दोघांना अटक

0

शिरपूर। तालुक्यातील हाडाखेड येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 जवळी गुरूद्वारा जवळ टाटा कंपनीची गाडीतून मध्यप्रदेश येथे तयार करण्यात आलेली बियरचे खोके घेवून जात होते. ही गाडी राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातील पथकाने कारवाई करत गाडीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पथकाने वाहन क्र. एमपी 09एचएफ 7787 ची हाडाखेड येथे तपासणी केली असता या वाहनात मध्यप्रदेश येथे निर्मित व विक्री करीता असलेले बिअरचे खोके आढळून आले. यात वाहनासह बियरचे खोके 53 लाख 84 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालक अन्सार खान इदा खान (रा. धार), सहचालक शाकीर अन्सार पटेल (रा. उज्जैन) यांना अटक करण्यात आली. ही कार्यवाही धुळे भरारी पथक निरीक्षक एम. एन. कावळे, शिरपूर विभाग निरीक्षक डी. एम. चकोर, हाडाखेडा राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक व्ही. बी. पवार, शिरपूर दुय्यम निरीक्षक अनिल बिडकर, धुळे भरारी पथक दुय्यम निरीक्षक एल. एम. धनगर, शांतीलाल देवरे, आर. एन. सोनार, ए. व्ही. भाडगे, प्रशांत बोरसे, अमोल धनगर, के. एम. गोसावी, जी. एस. पाटील, जी. व्ही. पाटील, कपिल ठाकूर, वाहन चालक विजय नाहिदे यांच्या पथकाने कार्यवाही केली. पुढील तपास एम. एन. कावळे करीत आहेत.